दोडामार्गात संचित परब तालुक्यात प्रथम ; 12th Grade Results

सोनिया गवस द्वितीय ; विघ्नेश धुरी तृतीय
Edited by: लवू परब
Published on: May 02, 2026 14:31 PM
views 137  views

दोडामार्ग :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या निकालात दोडामार्ग तालुक्यात वाणिज्य शाखेचा संचित सुभाष परब, ८७. ३३ टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. द्वितीय न्यू इंग्लिश स्कूल भेडशीची सोनिया अर्जुन गवस हिने ८५. ८३ टक्के  मिळविले तर कुडासे हायस्कूलचा विघ्नेश धुरी याने ८३. ५० टक्के गुण मिळवून तालुक्यात तृतीय येण्याचा मान मिळविला.

दोडामार्ग तालुक्यात एकूण २४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२6 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.