
सावंतवाडी : ऐतिहासिक वारसा, समृद्ध कला-संस्कृती आणि शैक्षणिक परंपरेची पताका अभिमानाने मिरविणाऱ्या सावंतवाडीच्या सांस्कृतिक क्षितिजावर ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन’ या नव्या क्लबची स्थापना व पदग्रहण सोहळा आर.पी.डी. हायस्कूलच्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. सम्राट क्लब इंटरनॅशनलशी संलग्न असलेल्या सम्राट क्लब मये यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या नव्या क्लबच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्राला संघटित व्यासपीठ देऊन समाजहिताचे विविध विधायक उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.
या सोहळ्यात चार्टर्ड प्रेसिडेंटपदी नरेंद्र देशपांडे यांची निवड झाली असून भावी अध्यक्षपदी पत्रकार हरिश्चंद्र पवार, सचिवपदी प्रा. प्रतिभा चव्हाण तर खजिनदारपदी सुनील राऊळ यांची वर्णी लागली आहे. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी पृथ्वीराज प्रताप,जनसंपर्क अधिकारी दादा मडकईकर, ऑडिटर कौस्तुभ पेडणेकर, प्रोग्राम डायरेक्टर म्हणून ॲड. सिद्धी परब यांची संचालकपदी (सदस्यत्व नोंदणी) डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, संचालिका (क्लब विस्तार) सौ. स्मिता केंकरे, संचालकपदी गुरूप्रसाद चिटणीस संचालिका डॉ. सोनल लेले यांना तर सदस्यपदी अक्षय देशपांडे शपथ देण्यात आली. या सावंतवाडी टाऊन सम्राट क्लब च्या सदस्य पदी राजन पंदारे हर्ष नकाशे कु. श्रुती सावंत दिलीप देसाई, प्रकाश तेंडुलकर, राजेंद्र देसाई, विक्रांत सावंत यांची सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी क्लबच्या वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठाम अभिवचन दिले. “सावंतवाडीला कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. या परंपरेचे जतन करण्यासाठी स्थापन झालेल्या या क्लबला शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचा अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य या दोन्ही भूमिकांतून सर्वोत्तम योगदान देण्याचा माझा प्रयत्न राहील.
सावंतवाडीच्या कला-संस्कृतीला नवी उंची आणि शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याची क्षमता या व्यासपीठात आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त करत नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. या सोहळ्याला सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी या क्लब साठी म्हणजे सावंतवाडी चा संस्कृतिक ठेवा कायम राखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने मदतीचे आश्वासन दिले. याच आरपीडी कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतले आणि याच सावंतवाडीमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून जनतेने मला निवडून दिले ते मला केवळ भारतीय जनता पार्टी करू शकते. सम्राट क्लब सावंतवाडी टाऊन मधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उच्च शिक्षित आणि विद्वान आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्लब निश्चितच नावारूपाला येईल असा विश्वास यांनी व्यक्त केला.
तसेच सम्राट क्लब इंटरनॅशनलचे डायरेक्टर क्लब एक्स्टेंशन धर्मा व्ही. चोडणकर, शशिकांत पुनाजी, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष शशिकांत पुनाजी, क्लब व विस्तार योजना, तसेच ब्लॉक प्रेसिडेंट–ब्लॉक ५ इंडक्शन ऑफिसर शुभम डिचोलकर क्लब मयेचे अध्यक्ष नरेश पेडणेकर (अध्यक्ष), गोरेश बाणावलीकर (सचिव), अनिकेत मांद्रेकर (खजिनदार), हर्षवर्धन परब, माजी अध्यक्ष अर्जुन नाईक यांच्या उपस्थितीत शपथ ग्रहण सोहळा पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर निवृत्त शिक्षणाधिकारी पी बी चव्हाण, वैभव केकरे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे सह विजय देसाई रुपेश पाटील अमोल टेंबकर रामचंद्र कुडाळकर उमेश सावंत निखिल माळकर आनंद धोंड,भुवन नाईक तसेच अनुराधा पवार, अमिषा सासोलकर ओम टेंबकर आदी पत्रकार व गोवा राज्यातील स्थानिक सम्राट परिवारातील मान्यवर, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात नरेश पेडणेकर यांनी क्लब स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. स्थानिक कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्याच्या निर्धाराने या नव्या सामाजिक-सांस्कृतिक पर्वाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातील माठेवाडा अंगणवाडी क्र. 15 च्या छोट्या चिमुकल्यांनी स्वागत गीत गायले. तर कार्यक्रमाचे आभार भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी मानले.










