मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार!

नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी व्यक्त केला विश्वास
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 12, 2026 22:51 PM
views 19  views

मालवण : मालवण नगरपरिषदेतील प्रतिष्ठेच्या  सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सहदेव बापर्डेकर यांनी सर्वांचे आभार मानले. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, आमचे आमदार निलेश राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचेही सहदेव बापर्डेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

माझ्या राजकोट, मेढा प्रभाग सहा मधील मतदार व नागरिक यांनी नगरसेवक म्हणून मला विजयी केले त्यामुळेच आज मी मालवण शहराचा बांधकाम सभापती झालो आहे. यासोबतच नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर व सर्व सहकारी नगरसेवक तसेच मालवण शहर वासियांचेही सहदेव बापर्डेकर यांनी आभार मानले आहेत.

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शना मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहणार आहोत. मालवण शहरातील जनतेला बांधकाम विभागाच्या माध्यमातून जलद आणि सुलभ सेवा देण्यासाठी तत्पर असल्याचे सहदेव बापर्डेकर यांनी सांगितले.