
सावंतवाडी : प. पू. श्री सद्गुरु मियासाब यांचा ८० वा पुण्यतिथी उत्सव सोहळा शनिवार २१ जून रोजी योगिनी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या समाधीस्थानी साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात पुण्यतिथी व सर्व उत्सवांच्या पूजेचे मानकरी म्हणून साईप्रसाद विनायक हवालदार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच पुरोहित म्हणून सुरेश पुराणिक, कोलगाव हे पौरोहित्य करणार आहेत.सकाळी ८ ते १० श्री सद्गुरु पूजन, सकाळी १० ते दुपारी १२ श्रींची प्रार्थना, नामस्मरण (चादर अर्पण करणे),दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते सायं. ६ नामस्मरण व कीर्तन, रात्री १० ते १२ ज्ञानेश्वरी / श्री एकनाथ भागवत वाचन, श्रींचे भजन, श्री हरिपाठ, आरती
अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महाप्रसादामध्ये ज्या भक्तांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन वसंत गोविंद राणे (अध्यक्ष), सतीश सु. शिरोडकर (उपाध्यक्ष), शैलेश पै (खजिनदार), प्रसाद अरविंदेकर (सरचिटणीस) आणि उमेश कोरगांवकर (सचिव) यांनी केले आहे.