LIVE UPDATES

मोती तलावात पडलेल्या वृद्धाला वाचविण्यात यश

Edited by: विनायक गांवस
Published on: May 25, 2026 21:52 PM
views 30  views

सावंतवाडी : मोती तलावात एक वयोवृद्ध पडल्याचे निदर्शनास आले. नगरपरिषदेसमोर हा प्रकार घडला. कर्मचारी आणि नागरिकांच्या साह्याने त्याला बाहेर काढण्यात आले. यात तो वृद्ध गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले. माठेवाडा येथील भागात तो राहत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. अधिक उपचार त्याच्यावर सुरू आहे.