
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी लढायचं आणि जिंकायचं असं ठरवलं आहे. सामाजिक क्षेत्रात आम्ही अग्रेसर आहोत. मी अनेक प्रश्न माझ्या मतदारसंघात सोडवलेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे जनता मला आशीर्वाद देईल असं मत तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार रूपेश राऊळ यांनी व्यक्त केले.
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून जनता मला साथ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच काही ठिकाणी सहकारी पक्षातील उमेदवारांना आम्ही सहकार्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अपक्ष मायकल डिसोजा यांनी पाठिंब्यासाठी हाक दिली तरी मी त्यांना साथ देणार नाही. मैत्रीचं नात असलं तरीही त्यांनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांना आम्ही कधीच साथ देणार नाही असं मत रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले. यावेळी उमेदवार दिनेश गावडेंसह शिवसैनिक उपस्थित होते.













