
कणकवली : मटका घेताना आढळल्याप्रकरणी मनोज तात्या हर्णे (४५, रा. कणकवली) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पोलिसांनी कणकवली शहरातील भालचंद्र नगर येथील एका टपरीकडे मंगळवारी सायंकाळी ७.४० वा. सुमारास केली.
यात २ हजार ५७० रुपये रक्कम, १ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा मिळून ३ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे हवालदार राजेंद्र मसुरकर यांनी केली.












