गोवा दारू बाळगल्याप्रकरणी गुन्हा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: January 22, 2026 19:36 PM
views 26  views

कणकवली : गोवा बनावटीची विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या स्थितीत आढळून आल्याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे (६९, फोंडाघाट - हवेलीनगर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने फोंडाघाट बसस्थानकानजीक गुरुवारी केलेल्या या कारवाईत ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.‌ याबाबतची फिर्याद एलसीबीचे पोलीस ज्ञानेश्वर तवटे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.