
सावंतवाडी : माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व उमेदवार हे आमच्या घरातलेच आहेत. त्यामुळे ही लढाई मैत्रीपूर्णच होईल, या मतदारसंघाची संस्कृती जपण्याच काम आम्ही करू असं मत भाजपचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, माजी मंत्री स्व. भाईसाहेब सावंत, स्व. विकास सावंत यांचा वारसा मला लाभला असून त्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाण्याच काम मी करणार आहे. तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी यांच्यासह मतदारसंघातील सर्वच गावातील ज्येष्ठांचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. महिला, युवांची ताकद ही आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे माजगाव, चराठा पंचायत समितीत देखील आम्हाला जनतेचा आशीर्वाद मिळेल. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याच काम आम्ही करणार आहोत असं मत श्री. सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, उमेदवार सचिन बिर्जे, उमेदवार उत्कर्षा गांवकर आदी उपस्थित होते.












