ZP - पं. - स. ; दोडामार्गात 57 अर्ज वैध

Edited by: लवू परब
Published on: January 22, 2026 16:58 PM
views 115  views

दोडामार्ग :  तालुक्यातील तीन जि.प. गट व सहा पं.स. गणासाठी दाखल झालेले एकूण ५७ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी दिली. गुरूवारी या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली असून २७ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

तहसील कार्यालयात गुरूवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बोलावून अर्जांची छाननी करण्यात आली. छाननी प्रक्रियेनंतर सर्व नामनिर्देशन पत्र वैध असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी घोषित केले. शुक्रवार पासून मंगळवार दि. २७ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा परिषद गटनिहाय

मणेरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) -सुनिता कमलाकर भिसे - अपक्ष, ललिता लक्ष्मण ताटे- ठाकरे शिवसेना, साक्षी विशांत तळवडेकर - शिंदे शिवसेना, सुनिता कमलाकर भिसे - भाजपा (एबी फॉर्म नाही); साटेली भेडशी (सर्वसाधारण महिला)- श्रेयाली सुभाष गवस- शिंदे शिवसेना (एबी फॉर्म नाही), दीप्ती ज्ञानेश्वर मयेकर- अपक्ष, सुमन गणपत डिंगणेकर- अपक्ष, सुनंदा सुधाकर धर्णे - ठाकरे शिवसेना व श्वेता सूर्यकांत धर्णे - भाजपा; माटणे - (सर्वसाधारण)- रवींद्र रामदास गवस - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), बाबुराव दत्ताराम धुरी - ठाकरे शिवसेना, आपा वसंत गवस - शिंदे शिवसेना (एबी फॉर्म नाही), लक्ष्मण दशरथ गवस -अपक्ष, प्रकाश लक्ष्मण कांबळे - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रवींद्र रामदास गवस -अपक्ष, संजय कृष्णा गवस- ठाकरे शिवसेना (एबी फॉर्म नाही), रामा उर्फ दीपक दशरथ गवस- भाजपा, एकनाथ अनंत नाडकर्णी - भाजपा (एबी फॉर्म नाही), एकनाथ अनंत नाडकर्णी - अपक्ष, राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर - भाजपा (एबी फॉर्म नाही) व राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर - अपक्ष

पंचायत समिती गणनिहाय

कोलझर (सर्वसाधारण)- गणेशप्रसाद शंकर गवस - शिंदे शिवसेना, शिरीषकुमार झिलू नाईक - अपक्ष, यशवंत गोविंद गवस -अपक्ष, प्रवीण बाबली परब -ठाकरे शिवसेना, सखाराम गुणाजी कदम -वंचित बहुजन आघाडी (एबी फॉर्म नाही), दौलतराव महादेव देसाई -अपक्ष; मणेरी (सर्वसाधारण) - दीपक बुधाजी जाधव -बहुजन समाज पार्टी, प्रीती बाबुराव धुरी -ठाकरे शिवसेना, संजय तुकाराम देसाई -अपक्ष, प्रवीण पांडुरंग गवस- अपक्ष, अनिरुद्ध अविनाश फाटक -अपक्ष, विजय लाडू जाधव- ठाकरे शिवसेना (एबी फॉर्म नाही), सोनिया विश्राम कुबल -भाजपा, आकांक्षा महेंद्र शेटकर - भाजपा (एबी फॉर्म नाही), भगवान चंद्रकांत गवस -शिंदे शिवसेना (एबी फॉर्म नाही), अजय श्रीकृष्ण परब -अपक्ष; कोनाळ  (सर्वसाधारण महिला)- चेतना चित्रसेन गडेकर -अपक्ष, सायली स्वप्नील निंबाळकर- शिंदे शिवसेना, सायली स्वप्निल निंबाळकर -अपक्ष, सोनाली सुनील गवस -ठाकरे शिवसेना, स्वरा सचिन देसाई -अपक्ष, जेनिफर मार्शल लोबो- ठाकरे शिवसेना (एबी फॉर्म नाही), साक्षी संदीप देसाई -अपक्ष, अश्विनी उत्तम ठाकूर -ठाकरे शिवसेना (एबी फॉर्म नाही); साटेली भेडशी ( नागरिकांचा मागास प्रवर्ग)- गंगाराम जानू कोळेकर -अपक्ष, सिद्धेश गुरुनाथ कासार- ठाकरे शिवसेना, संदीप मोगरा नाईक -राष्ट्रीय काँग्रेस, संजय पांडुरंग सातार्डेकर -भाजपा; झरेबांबर (सर्वसाधारण महिला)- स्नेहा संजय गवस -शिंदे शिवसेना, विनिता विष्णू घाडी- ठाकरे शिवसेना, दीक्षा लक्ष्मण महालकर -अपक्ष, वृषाली प्रकाश गवस -अपक्ष, आकांक्षा महेंद्र शेटकर -भाजपा (ए बी फॉर्म नाही); माटणे  (सर्वसाधारण महिला) - प्रिया तुषार नाईक- ठाकरे शिवसेना, पार्वती महादेव गवस- भाजपा, सुप्रिया शैलेश नाईक अपक्ष