
कणकवली : शहरातील निम्मेवाडी ते चव्हाटा मंदिर या मार्गावरील गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पायवाटेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक राकेश राणे यांनी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत स्वखर्चातून या मार्गावर चिरेबंदी पायवाट बांधून दिली आहे. या कामामुळे स्थानिक ग्रामस्थांसह देवतरंग देवस्थळी जाणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक राकेश राणे यांचा स्वयंभू मंदिरात शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
निम्मेवाडी ते चव्हाटा मंदिर या मार्गावर पायवाटेची योग्य व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना तसेच देवतरंग देवस्थळी ये-जा करणाऱ्या भाविकांना अनेक वर्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत होता. या मार्गावर चांगली पायवाट व्हावी, अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. मात्र, हा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने नागरिकांची आणि भाविकांची गैरसोय कायम होती.
स्थानिकांची ही अडचण लक्षात घेऊन नगरसेवक राकेश राणे यांनी ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार पुढाकार घेतला. कोणत्याही निधीची वाट न पाहता त्यांनी स्वखर्चातून चिरेबंदी पायवाटेचे काम पूर्ण करून दिले. त्यामुळे आता या मार्गावरून ग्रामस्थांना तसेच देवतरंग देवस्थळी जाणाऱ्या भाविकांना अधिक सुलभतेने ये-जा करणे शक्य झाले आहे.
पायवाटेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक राकेश राणे यांचा स्वयंभू मंदिरात शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी गावपुरुष बबन राणे सदानंद राणे अंबाजी राणे , सखाराम राणे बाळा परब प्रशांत साटम राजू गुरव सुमित राणे विजय मेस्त्री बळीराम राणे दशरथ राणे बंडू पारकर बाळा राणे कैलास राणे दत्तात्रय राणे दीपक राणे जीजी राणे हे यांनी नगरसेवक राकेश राणे उपस्थित होते
समाजहिताची कामे यापुढेही सुरू ठेवणार : राकेश राणे
ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यातही अशाच प्रकारे समाजहिताची कामे करत राहणार असल्याचे नगरसेवक राकेश राणे यांनी यावेळी सांगितले.
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत प्रत्यक्ष कृतीतून त्या सोडविल्यास स्थानिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, याचे उदाहरण या पायवाटेच्या कामातून पाहायला मिळत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








