
सावंतवाडी : बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीतील ठराव वाचनावरून शिवसेनेन आक्रमक पवित्रा घेतला. वाचनात आलेला मुद्दा आमच्या अजेंड्यावर का दिसत नाही ? असा सवाल माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केला. यावेळी याला शिवसेना नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदवला.
यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी यात टिपणी वाचन केलं असून आपणही नगराध्यक्ष राहीला आहात असा टोला लगावला. यावेळी ज्ञानप्रबोधिनीत जुगार चालतो की मटका ? आम्हाला पण कळुदेत ही कंपनी नेमक काय करते ? ते आम्हालाही कळूदेत असा सवाल नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. तर रोजगाराचा मुद्दा असल्याने मुदतवाढ देण्यात यावी अस मत नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी व्यक्त केले. तर आमच्या अजेंड्यावर त्यांनी वाचलेला मुद्दा का नाही ? असा सवाल शिवसेना नगरसेवकांनी केला. तर नगरसेवक तौकिर शेख यांनी या कंपनीला जागा देऊ नये अशी भूमिका घेतली. तर नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी न.प.च्या जागा पडीक असून तिथे स्थानिकांना रोजगारासाठी द्या असे सांगितले. नगरसेवक अजय गोंदावळे यांनी हात उंचावून ठरावावर मतदान घ्यावं असे स्पष्ट केले.तर आनंद नेवगी यांच्याकडून या कंपनीच्या संचालकाकडून नगरपरिषदेची बदनामी झाल्याचे सांगत तसेच इथे असलेल्या पूर्वीच्या कंपनीने थकविलेले पैसे अन् पगार बघता अशा कंपन्यांना न.प.ची जागा देऊ नये असे सांगितले. याबाबत झालेल्या चर्चेतून या कंपनीला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.










