LIVE UPDATES

कणकवलीत महाराणा प्रताप जयंतीनिमित्त मराठा समाजाकडून अभिवादन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 17, 2026 14:15 PM
views 131  views

कणकवली : हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान, शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेले वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची तिथीनुसार जयंती आज साजरी करण्यात आली.

यानिमित्त कणकवली शहरातील वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथे मराठा समाज व राणे ज्ञाती बांधवांच्यावतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराणा प्रताप यांच्या शौर्य आणि पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाला बहुसंख्य राणे ज्ञाती बांधव उपस्थित होते.