
देवगड : देवगड तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ जून २०२६ पूर्वी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज दाखल करण्याचे आवाहन देवगडचे प्रभारी तहासीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत स्वरुपात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना सुरु करण्यात आल्या आहेत. सदर योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या सदर पाच योजनांमधील डी. बी. टी. पोर्टलवर नोंद असलेले सर्व दिव्यांग लाभार्थी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संदर्भिय शासन क्र. २ नुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २७ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयप्रमाणे वैश्विक ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
विशेष सहाय्य योजनेतील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) नाही, अशा लाभार्थ्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) बंधनकारक आहे. त्यानुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना १ एप्रिल २०२६ पूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतून दिव्यांग प्रवर्गातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २० ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान देण्यात येत होते, फक्त अशा लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचे लाभ चालू ठेवण्यासाठी १५ जून २०२६ पूर्वी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज सादर करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ जून २०२६ पूर्वी वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) स्वावलंबन पोर्टल अन्वये अर्ज दाखल करण्याचे आवाहन देवगडचे प - भारी तहासीलदार सूर्यकांत पाटील यांनी केले आहे.












