
- निमित्त मंत्री नितेश राणे वाढदिवस सदिच्छा भेटीचं
मुंबई : राजकीय वर्तुळात चर्चा काहीही असो, मात्र आजचा एक फोटो अनेक राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधून घेत आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सदिच्छा भेटीतील एका छायाचित्राची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
या छायाचित्रात मंत्री नितेश राणे हे त्यांचे खंदे समर्थक गोट्या सावंत आणि समीर नलावडे यांच्या खांद्यावर हात ठेवून दिसत आहेत. त्यामुळे या फोटोमधून पक्षातील आणि स्थानिक राजकारणातील अनेक संदेश दिले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत तिकीट मिळत नसल्याने गोट्या सावंत यांच्या भूमिकेबाबत त्यावेळी राजकीय चर्चांना उधाण आले होते. तसेच कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या काळात समीर नलावडे यांच्याभोवतीही राजकीय वातावरण तापले होते. विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले होते. या निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता.
मात्र, आता मंत्री नितेश राणे यांच्यासोबतचा हा फोटो समोर आल्यानंतर जुन्या चर्चांना नव्याने उजाळा मिळाला आहे. नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमधील संबंध अधोरेखित करणारा हा फोटो असल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे.
राजकीय वर्तुळात अनेकदा व्यक्तींच्या भूमिकांबाबत अंदाज बांधले जातात; मात्र नेत्यांसोबतचे सार्वजनिक क्षण अनेकदा वेगळे राजकीय संकेत देतात. त्यामुळे वाढदिवसाच्या सदिच्छा भेटीतील हे छायाचित्र सध्या सिंधुदुर्गच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.











