
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा देवगड-कणकवली-वैभववाडी मतदारसंघाचे आमदार Nitesh Rane यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम यांच्या सौजन्याने शिरगाव परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शिरगाव गावठण, आंबेखोल, निमतवाडी, राकसवाडी, शेवरे, हडपीड आणि चाफेड येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना वह्या तसेच अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच चाफेड ग्रामपंचायतीचे सरपंच साहिल पांचाळ यांनी चाफेड येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात अधिक सक्षम करण्यासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तसेच आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचेही कौतुक करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमित साटम, शिरगाव पंचायत समिती सदस्या शीतल तावडे, चाफेडचे सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, विजय परब, विशाल राणे, पंढरीनाथ कंडर, सुनील धुरी, प्रफुल्ल परब, सुदर्शन साळकर, मानसी परब, राधिका ठुकरूल, प्रतिभा मेस्त्री, वसंत पवार, नंदू देसाई, सुनील कांडर, नागेश साळकर, युद्धी राणे, मंगेश लोके, दाजी राणे, सुहास राणे यांच्यासह संबंधित शाळांतील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











