
औचित्य मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचं
दोडामार्ग : समाजकारण आणि लोकहिताच्या विविध उपक्रमांमधून सातत्याने पुढाकार घेणारे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखालील संतोष नानचे मित्रमंडळ, दोडामार्ग यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला.
यावेळी उद्घाटन कार्यक्रमपर बोलताना संतोष नानचे म्हणाले की, दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन आपण प्रथम शाळेसाठी विहिरीची व्यवस्था करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शुद्ध, सुरक्षित आणि निर्मळ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायरची मागणी करण्यात आली होती. मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही मागणी पूर्ण करण्यात आली.
मंगळवारी सकाळी १० वाजता दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण करण्यात आले. या सुविधेमुळे शेकडो विद्यार्थ्यांना वर्षभर स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, उद्योजक अमित गजानन कामत, दोडामार्ग व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उदय पास्ते, वैभव इनामदार, सुधीर चांदेलकर, किरण काळबेकर, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले, मनोज खांबल,t सुनील म्हावळणकर, सुमंत मणेरीकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील तसेच शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या लोकहिताच्या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या उपक्रमामुळे शाळेतील मुलांना शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण असल्याचे मत मुखाध्यापक पाटील यांनी व्यक्त करण्यात आले. संतोष नानचे मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दोडामार्ग तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्राला मोठा हातभार लागला असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशाच समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संतोष नानचे म्हणालेत.











