LIVE UPDATES

युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 07, 2026 20:14 PM
views 42  views

दोडामार्ग : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा. प्रत्येक कुटुंबाला हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून आज दोडामार्ग तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्याकडे गणेश पुजा साहित्य सुपूर्द करण्यात आले.

भाजपा जनसंपर्क कार्यालय, सावंतवाडी येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विशाल परब यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांकडे पूजा साहित्य सुपूर्द करण्यात आले. हे साहित्य दोडामार्ग तालुक्यातील गणेशभक्तांच्या घरोघरी सन्मानपूर्वक पोहोचवावे आणि त्यांच्या गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन विशालजी परब यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी विशाल परब यांच्यासह रंगनाथ गवस, शिरीष नाईक, तसेच तालुक्यातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख महेश लोंढे, सूर्याजी झेंडे, सुरेंद्र संभाजी सावंत, प्रकाश गवस संतोष आईर उपस्थित होते. या कार्यक्रमाला उसप बूथ अध्यक्ष नीलेश नाईक, नवनाथ साळिकर, विनायक सावंत, शंकर परब, किशोर शेट्ये, उत्तम दळवी, विठ्ठल गवस, वृषभ देसाई, ज्ञानेश्वर आईर, मंगेश नाटेकर, रमेश ठाकूर, चंद्रहास राऊळ, विजय चंद्रकांत ठाकूर, कल्पेश गवस, प्रवीण गवस, यशवंत कुबल, ओंकार रेडकर आणि बूथ अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विशाल परब यांच्या पुढाकारातून गेली अनेक वर्षे गणेशोत्सवानिमित्त हा सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतो. सालाबादप्रमाणे यंदाही कोकणातील गणेशोत्सव प्रत्येक घरात आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने साजरा व्हावा, या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गणेशभक्तांच्या घरोघरी पूजा साहित्य पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून, प्रत्येक कुटुंबाच्या सणाच्या आनंदात सहभागी होण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे गणेशभक्त आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे. कोकणातील प्रत्येक कुटुंबाचा गणेशोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा, हीच या उपक्रमामागची भावना आहे, असे विशाल परब यांनी सांगितले.