LIVE UPDATES

दृष्टीहीन संघटनेला सर्वतोपरी मदत करणार : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले

संघाच्या कार्यालयाच्या जागेसाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन : राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा वर्धापन दिन साजरा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 30, 2026 19:49 PM
views 51  views

सावंतवाडी : राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा कोकण यांचा वर्धापन दिन उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दृष्टीहीन संघटनेला सर्वतोपरी मदत देण्याची भावना व्यक्त केली. तर शहरात राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या कार्यालयाच्या जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, तहसिलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दिपाली गोटे, समाजसेविका सौ.नानी कशाळीकर, केतन सावंत, डॉ.मनेश नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्री विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर व स्त्री रोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्व दुर्भाटकर यांच्यावतीने दिव्यांगाच्या मुलांना दरवर्षीप्रमाणे शालेय वह्या, छत्र्या व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, खजिनदार नंदा सावंत, सहसचिव प्रकाश वाघ, सहसचिव शाम माजगावकर,  उपाध्यक्ष संतोष दळवी, उपाध्यक्ष सदानंद पावले, प्रशांत कदम, सुरेश दामले, वामन बिर्जे, शेजल आळवे, रंजना देसाई, काशिबाई दळवी, सविता गावडे, मंदार आळवे आणि शेकडो अंध बांधव व त्यांची शाळकरी मुले उपस्थित होती.

अंधविद्यार्थीनी अर्पिता दळवी हीला 10 वी मध्ये 70 टक्के म्हणून तहसिलदार यांच्या हस्ते सत्कार करणेत आला. तसेच उमेश पेडणेकर विद्यार्थी याचाही सत्कार करण्यात आले.  कार्यक्रमातील उपस्थितांसाठी सौ.श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी स्नेह भोजन दिले. तसेच डॉ.मनेश नाईक यांनी अल्पोपहार दिला. तर गौरव दळवी यांनी गौरग डेकोरेटर्स तर्फे मोफत साऊंड सिस्टीम उपलब्ध करुन दिली. तहसिलदार श्रीधर पाटील, पुरवठा अधिकारी दिपाली गोटे यांनी अंधअपंगासाठी दाखले, अंत्योदय योजनेसाठी नावे जागेवर करुन दिले.