
कणकवली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्यानिमित्ताने कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने समृद्ध पंचायतराज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान करण्यात आले असून आज कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वच्छ स्मशानभूमी, स्वच्छ संकुल, नगर कॉलोनी स्पर्धा, स्वच्छ वाडी स्पर्धा, प्रबोधनपर पथनाट्य, शालेय टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा , फुगडी अश्या उपक्रमानी कलमठ ग्रामपंचायतने ‘समृद्ध पंचायतराज महोत्सव’ साजरा करण्यात आला. गावातील विकासकामांचा शुभारंभ माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री , माजी पंस सदस्य महेश लाड यांच्या, जेष्ट कार्यकर्ते अशोक खाजनवाडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कलमठ ग्रामपंचातच्या श्री काशी कलेश्वर सभागृहात स्वच्छता आणि ग्रामीबी विकासावर आधारित फुगडी कलमठ गावातील महिलांनी सादर केली.
४ महिने कलमठ गावातील प्रत्येक घटक समृद्ध पंचायतराज अभियानात मेहनत घेत असल्याने आम्हाला या स्पर्धेत संघटितपणे काम करणे सुलभ झाले या सर्व मेहनतीच यशात रूपांतर आपल्याला समृद्ध पंचायतराज अभियानात होईल असा विश्वास प्रस्ताविक करताना सरपंच संदीप मेस्त्री यांनी व्यक्त केला.
कलमठ गावचे उपक्रम नाविन्यपूर्ण : अरुण चव्हाण, BDO, पं. स. कणकवली.
समृद्धी पंचायतराज अभियानाच्या आधीपासूनच कलमठ ग्रामपंचायत नियोजनबद्ध आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्या बद्दल कौतुक केले मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान साठी शुभेच्छा व्यक्त केला
टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धेतील ३ गटातील १२ विद्यार्थ्याना गौरविण्यात आले यावेळी विजेत्या विद्यार्थ्यानी बनवलेले टिकाऊ वस्तूंचे ग्रामपंचायत मध्ये प्रदर्शन भरवण्यात आले होते. या स्पर्धेत ५७ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी केली.
बेस्ट फ्रॉम वेस्ट स्पर्धेचे निकाल
ग्रुप 1 (1 & 2)
1. ओवी गोठणकर (कुंभारवाडी )
2. सारा दावर (गावडेवाडी )
3. अध्या राणे (कलमठ बाजारपेठ )
4. राज घाडीगावकर (कुंभारवाडी)
ग्रुप 2 (3 & 4)
1. संकेत देसाई (कुंभारवाडी)
2. रुही पाटील (कलमठ बाजारपेठ )
3. पियुष पवार (गावडेवाडी)
4. अराधना लोदी (गावडेवाडी)
ग्रुप 3 (5 ते 7)
1. नमिष चिंदरकर (कुंभारवाडी)
2. वैभवी घाडीगावकर (कुंभारवाडी)
3. वेदांगी घाडीगावकर (कुंभारवाडी)
4. स्वाती जाधव (कलमठ बाजारपेठ )
यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण , गटविकास अधिकारी तन्मय मांडरेकर , सहाय्यक गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड ,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग,ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर ,स्वप्नील चिंदरकर , नितीन पवार , अनुप वारंग, सचिन खोचरे , स्वाती नारकर ,सुप्रिया मेस्त्री , श्रेयस चिंदरकर ,रवींद्र यादव , नजराना शेख, गुरु वर्देकर , आबा कोरगावकर , तेजस लोकरे , स्वरूप कोरगावकर , समर्थ कोरगावकर आदी ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.











