कारिवडे गावातील 8 मंजुर विकास कामांचं भूमिपूजन

महेश सारंग यांचे विशेष प्रयत्न
Edited by: विनायक गांवस
Published on: January 01, 2026 16:50 PM
views 77  views

सावंतवाडी : भाजप सरचिटणीस महेश सारंग यांच्या विशेष प्रयत्नातून कारिवडे  गावात 8 मंजुर विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कारिवडेच्यावतीने पार पडला. यावेळी कारिवडे गावाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. साकव, बंधारे आणि रस्त्यांच्या कामांमुळे ग्रामस्थांची मोठी सोय होणार असून शिवकालीन तळीच्या विकासामुळे पर्यटनालाही चालना मिळेल असा विश्वास श्री. सारंग यांनी व्यक्त केला.

मंजूर झालेली 8 विकासकामे पुढीलप्रमाणे असून यात कारिवडे भैरववाडी वेताळ भेटले नदीवर साकव बांधणे.ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग मंजूर रक्कम 50,कारिवडे पेडवेवाडी मारुती मंदिर येथे बंधारा बांधणे मंजूर रक्कम -30लक्ष,जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025-26 जनसुविधा अंतर्गत कारिवडे भैरववाडी मुख्य रस्ता ते शिवा सावंत रस्ता मजबुतीकरण करणे  मंजूर रक्कम -5 लक्ष,कारिवडे भैरववाडी सावंतवाडा रस्ता क्र.1 पासुन ते विश्राम भिवा सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे -स्थानिक विकास कार्यक्रम2025-26 मंजूर रक्कम -5 लक्ष, कारिवडे कुंभारवाडी रस्ता सा.क्र.0/00 ते 1/00 खडीकरण व डांबरीकरण करणे.ता.सावंतवाडी  मंजूर रक्कम -9 लक्ष,कारिवडे भैरववाडी जि.प.पुर्ण प्राथ. शाळा भैरववाडी  नं.4 दुरुस्ती करणे जि.प.क्षेत्रातील प्राथ.मध्या.शाळांची इमारती आणि वर्गखोल्यांचे बांधकाम, शौचालय आणि इतर बांधकामे -2025-26 शाळेची योजना मंजूर रक्कम -3 लक्ष ,कारिवडे भंडारी टेंब येथे शिवकालीन तळी पर्यटनासाठी विकास करणे-जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मंजूर रक्कम 30 लक्ष या विकासकामांचे भुमिपुजन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कारिवडे गावच्या सरपंच आरती माळकर,भारतीय जनता पार्टी आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, महेश गांवकर, ग्रा.प.सदस्य, अरुणा सावंत, ग्रा.प.सदस्या ,तन्वी साईल,ग्रा.प.सदस्या, प्रतिभा जाधव, ग्रा.प.सदस्या, माजी सरपंच तानाजी साईल, गावप्रमुख बाळा गांवकर,शक्ती प्रमुख आनंद तळवणेकर,बुथ अध्यक्ष रुपा सावंत,कारिवडे सोसायटी व्हा.चेअरमन रविंद्र ठाकुर,कारिवडे सोसायटी संचालक सोनु सावंत, लक्ष्मण सावंत,संजय सावंत, नारायण साईल, तसेच भैरववाडी सावंतवाडा येथील ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विकासकामांबद्दल कारिवडे ग्रामस्थांनी महेश सारंग आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.