विठ्ठल रखुमाई मंदिराचे पुजारी प्रमोद भागवत यांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: January 01, 2026 16:56 PM
views 57  views

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिरास २०२५ मध्ये ३०० वर्षे पूर्ण झाली त्या निमित्ताने किर्तनकार विश्वनाथ ( भाऊ) नाईक यांच्या शुभहस्ते मंदिरांचे पुजारी प्रमोद भागवत यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 


गेली अनेक वर्षे त्यांच कुटुंब व ते पुजारी म्हणून इथे सेवा देत आहेत. मंदिरास ३०० वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विठ्ठलभक्त बंड्या धारगळकर.श्री.सावंत, राजन म्हाडेश्वर, बाबल डिचोलकर,  रत्नाकर माळी आनंद भोगण व भक्तगण उपस्थित होते.