
कणकवली : राजू शेट्टी यांचा निषेध करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी गेल्या वर्षी आंबा बागायतदारांवर थ्रिप्सचे संकट कोसळले त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील असेच वक्तव्य केले होते, त्याचा निषेध का केला नाही? औषध विक्रेत्यांनी ही पत्रकार परिषद पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून घेतली, असा आरोप कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केला.
राजू शेट्टी यांचा निषेध करत असाल तर आम्हीही तुमचा निषेध करू असा इशाराही नाईक यांनी दिला. तर 23 तारीख पर्यंत आंबा व काजू बागायतदारांना अपेक्षित नुकसान भरपाई न मिळाल्यास आणि बागायतदारांसह रस्त्यावरती उतरू असा इशारा नाईक यांनी दिला उपनगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत सुशांत नाईक बोलत होते. यावेळी नगरसेवक जयेश धुमाळे संकेत नाईक उपस्थित होते.











