
वैभववाडी : मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने दत्तकृपा प्रतिष्ठान, वैभववाडी यांच्या वतीने १९ मार्चला सायंकाळी ५ शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.ही शोभायात्रा दत्त मंदिर ते संभाजी चौक इथं पर्यंत काढण्यात येणार आहे.
यामध्ये पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा पथक, दुचाकी रॅली (महिला व पुरुषांसाठी), पालखी मिरवणूक, लेझिम पथक तसेच वारकरी दिंडी यांचा समावेश असणार आहे. विशेष आकर्षण म्हणून लहान मुलांसाठी विविध वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार असून, विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहावे, असे आवाहन दत्तकृपा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर यांनी केले आहे.










