LIVE UPDATES

सावंतवाडीत साधूच्या वेशातील मंडळींची पोलिसांकडून चौकशी

ओळखपत्रांची तपासणी : गाडी बंद पडल्याने भिक्षा मागत असल्याचा दावा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 16:41 PM
views 87  views

सावंतवाडी : साधूच्या वेशात असलेले लोक गृपने बाजारपेठेत भीक्षा मागण्यासाठी फिरत असल्याने त्यांची सावंतवाडी पोलिसांकडून चौकशी करत त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. भीक्षा मागण्यासाठी फिरत असल्याचे यावेळी त्यांच्याकडून पोलीसांना सांगितले गेले.

दुपारच्या सुमारास साधूच्या वेशातील ही मंडळी गृपने सावंतवाडी बाजारपेठेत भीक्षा मागत फिरत होती. यावेळी पोलीसांकडून त्यांची चौकशी केली असता ते मध्यप्रदेश येथील असल्याचे समोर आले. भिमाशंकर येथे जात असताना सावंतवाडीत आपली गाडी बंद पडल्याने भीक्षा मागण्यासाठी बाजारात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर सावंतवाडी पोलिसांकडून त्यांची ओळखपत्र तपासत त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले. दरम्यान, शहरात घडणाऱ्या घटना बघता पोलीसांकडून अशा व्यक्तींची चौकशी केली जावी. त्यांची ओळख तपासावी, जेणेकरून लोकांची होणारी फसवणूक व घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी मदत होईल असे आवाहन नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केले. यावेळी बाजारपेठेतील व्यापारी, नागरिक उपस्थित होते.