LIVE UPDATES

तळवणे उपसरपंचपदी देविका बर्डे यांची नियुक्ती

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 17:26 PM
views 32  views

सावंतवाडी : तळवणे ग्रामपंचायत उपसरपंचपदी देविका बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. तळवणे ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी झालेल्या या निवडणुकीसाठी देविका रामचंद्र बर्डे व सिद्धेश सगुण कांबळी यांनी अर्ज भरला होता. यात देविका बर्डे ६-५ ने विजयी झाल्या.

सौ. बर्डे यांनी महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासात्मक कामांवर विश्वास ठेवून व जिल्हा परिषद माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर व सरपंच समीर केरकर, माजी पंचायत समिती उपसभापती संदीप नेमळेकर, रामचंद्र गावडे, विजय रेडकर आणि भाजपा कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून आपल्या गावातील विकासकामांसाठी त्यांनी माजी महिला बालकल्याण सभापती शर्वांणी गावकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी विद्यमान पंचायत समिती सदस्या नेहा कांबळी, माजी पंचायत समिती उपसभापती संदीप नेमळेकर, भाजप बांदा मंडळ सरचिटणीस नारायण कांबळी, तळवणे गावचे सरपंच गोविंद केरकर, तळवणे गावचे माजी उपसरपंच रामचंद्र गावडे, दत्ताराम बर्डे, किनळे गावचे सरपंच दिपक नाईक, किनळे माजी उपसरपंच प्रशांत तळवणेकर, कवठणी माजी सरपंच शेखर गावकर, तळवणे माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष विजय रेडकर, जितेंद्र बर्डे, सिद्धार्थ मठकर, रामचंद्र बर्डे, देविका बर्डे,गणेश चोडणकर, विद्यमान सर्व तळवणे ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच देविका बर्डे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.