LIVE UPDATES

वैभववाडी पत्रकार समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा उद्या गुणगौरव सोहळा

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 26, 2026 18:26 PM
views 10  views

वैभववाडी :  वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्यावतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ बुधवारी २७ मे  ला सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, वैभववाडी येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे हे राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे,  गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, पोलीस निरीक्षक मनोज सोनलवकर, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे तसेच उपसभापती साची कोलते उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 या कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.