LIVE UPDATES

गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतील गौणखनिज उपसा ?

ग्रामस्थांचं आमरण उपोषण
Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2026 12:47 PM
views 58  views

अहवाल मिळेपर्यंत हटणार नसल्याचा इशारा 

सावंतवाडी : माडखोल मंडळ अधिकारी, तलाठी कार्यालय समोर ग्रामस्थांकडून आमरण उपोषण छेडण्यात आले आहे. तेरेखोल नदीपात्रातील माडखोल, सांगेली, कलंबिस्त, ओटवणे, इन्सुली या भागात गाळ काढण्याच्या नावाखाली नदीतील गौणखनिज उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण छेडले आहे.


वाळू, दगड, गोटे, उपसा करत त्याचे मोठ ढिग तयार करून क्रशर व स्क्रीनींग मशीनचा वापर करून अर्धवट पासच्या व वाहतुक करणाऱ्या गाडीमध्ये ९०% पेक्षा जास्त वाळू, दगड असताना साध्या मातीच्या पासच्या नावाने राजरोसपणे व दडपशाहीचा वापर करून परराज्यात वाहतुक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करावी  तसेच तहसिलदार यांनी तलाठी कार्यालयास पाठवलेल्या आदेशाचे पालन करत अर्जात नमुद सर्व ठिकांणावर पाहणी करुन प्रामाणिक अहवाल द्यावा. जोपर्यंत बेकायदेशिर गौणखनिज साठे व वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नाही, प्रामाणिक अहवाल मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.