LIVE UPDATES

फणसवडेत दक्षिण अमेरिकेतील दुर्मीळ झाडांचे वृक्षारोपण

संदीप गावडे मित्रमंडळ व भाजपचा पुढाकार
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 05, 2026 12:03 PM
views 49  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि संदीप गावडे मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने फणसवडे गावात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. मूळची दक्षिण अमेरिकेतील असलेली ही दुर्मीळ झाडे फणसवडे गावातील पोषक वातावरणामुळे येथे लावण्यात आली आहेत.

फणसवडे येथील ग्रामस्थांच्या वतीने यावेळी उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आंबोली जि. प. सदस्य सौ. शोभा गुलाबराव गावडे, तळवडे जि. प. सदस्य संदीप गावडे, कोलगाव जि.प. सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी पं. स. उपसभापती गौरव मुळीक, विलवडे पं. स. सदस्य प्रशांत सुकी, केसरी-फणसवडे सरपंच सौ. स्नेहल गुरुनाथ कासले, देवसू सरपंच रुपेश सावंत, गेळे सरपंच सागर ढोकरे, केसरी उपसरपंच भिवा सावंत, अमोल सावंत, दत्ताराम सावंत, फणसवडे प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, एकनाथ गावडे, यांच्यासह ग्रामस्थ आणि दशक्रोशीतील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.