LIVE UPDATES

पेट्रोल - डीझेल पुन्हा महागलं ; 10 दिवसांत तिसऱ्यांदा वाढ

सर्वसामान्यांना फटका
Edited by: विनायक गांवस
Published on: May 23, 2026 11:07 AM
views 307  views

सावंतवाडी : देशभरात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी 23 मे 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. 10 दिवसांत ही तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनता आणि वाहतूक क्षेत्र या दोघांमध्येही चिंता वाढली आहे. 

पेट्रोलचा प्रतिलीटर 87 पैसे आणि डिझेलची प्रतिलीटर 91 पैशांनी वाढले आहेत.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी 88 टक्क्यांहून अधिक तेल आयात करतो. आंतरराष्ट्रीय किंमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे 6 टक्क्यांनी कमकुवत झाला आहे. सध्या एका डॉलरचे मूल्य अंदाजे 95.6 रुपयांवर पोहोचले आहे.