LIVE UPDATES

विहिरीत पडलेल्या वासराला नागरिकांनी दिले जीवदान

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 23, 2026 21:28 PM
views 26  views

कणकवली : तेलीआळी येथे एका विहिरीत शनिवारी सकाळीच्या सुमारास  पडलेल्या वासराला जागरूक नागरिकांनी जीवदान दिले आहे. सकाळच्या सुमारास विहिरीत पडलेल्या वासराने जोरदार हंबरायला सुरुवात केली. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांना विहिरीत वासरू पडले असल्याचे समजले.  त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली असता नागरिक व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिथुन ठाणेकर, महेश डिचोलकर, चेतन फोडेकर, आशिष वालावलकर यांच्यासह नगरपंचायत कर्मचारी प्रकाश राठोड व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.