LIVE UPDATES

रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली आकाशियाची झाडे वाहतूकीस धोकादायक

वाहनचालकांमधून व्यक्त होतेय भीती
Edited by: विनायक गांवस
Published on: May 23, 2026 21:27 PM
views 37  views

सावंतवाडी : सावंतवाडी शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरी समोर रस्त्याच्या दुतर्फावर वाळलेली आकाशियाची झाडे वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात ही झाडे रस्त्यावर कोसळून अपघात होण्याची भिती वाहनचालकातून व्यक्त होत आहेत.

सावंतवाडी तालुक्यात प्रशासनाकडून पावसाळ्याच्या तोंडावर खबरदारी म्हणून आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घरी देणाऱ्या सावंतवाडी शिरोडा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे वाळलेली आहेत. रेल्वे स्थानक ते निरवडे आरोस तिठा या भागात आकाशियाची झाडे वाळलेली आहेत. गेली दोन-चार वर्ष वाळून जीर्ण झालेली ही झाडे कधीही कोसळून रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही झाडे एखाद्या वाहनावर पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. अलीकडेच आंबोली या ठिकाणी एका चारचाकी वाहनावर झाडाची फांदी पडल्याने अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसती तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशाच प्रकार सावंतवाडी शिरोडा महामार्गावरील गिरड व वाळलेल्या झाडामुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची खबरदारी घेत ही झाडे त्वरित हटवावीत व हा मार्ग पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी सुरक्षित बनवावा अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकातून होत आहेत.

वारंवार या झाडांकडे लक्ष वेधूनही तसेच स्थानिकांकडून पाठपुरावा करूनही याबाबत कुठल्याच प्रकारची दखल संबंधित विभाग घेताना दिसून येत नाही. यावर्षी तरी पावसाळा सुरू होण्याआधी हे झाडे त्वरित आठवावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.