LIVE UPDATES

रणस्तंभ कलंबिस्त येथे वीर हुतात्म्यांना अभिवादन

भाजप युवा नेते विशाल परब यांच्याकडून आदरांजली
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 10:33 AM
views 160  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या  वीर हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी रणस्तंभ, कलंबिस्त येथे भाजप युवा नेते विशाल परब यांनी उपस्थित राहून सन 1914 ते सन 1918 या पहिल्या महायुद्धातील वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहत आदरांजली अर्पण केली.यावेळी रणस्तंभास पुष्प अर्पण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या शौर्य, त्याग आणि देशभक्तीची प्रेरणा आजच्या पिढीने घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास माजी सैनिक प्रकाश सावंत, सगूण पास्ते, दत्ताराम घोगळ, रामचंद्र सावंत, बाबल अल्मेडा, बाबुराव कविटकर, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, निखिल बिडये, प्रवीण सावंत, रवींद्र मेस्त्री, माजी सरपंच शरद नाईक, समीर राजगिर, महादेव जंगम, भरत म्हाडगुत, विनेश तावडे तसेच समस्त देवकर गावकर मंडळी उपस्थित होती.रणस्तंभ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमातून वीर हुतात्म्यांच्या त्यागाला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.