LIVE UPDATES

आंबोलीत पर्यटकाचा सर्पदंशाने मृत्यू

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 10, 2026 11:41 AM
views 59  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्टकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे‌. जीवाणूने दंश केल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर येत असून सावंतवाडी पोलीसांकडून अधीक तपास सुरू आहे. संबंधित पर्यटक हा कर्नाटक राज्यातील असल्याचे समजते. गंगाधर मरीअप्पा कोरावार रा. कमलापूर, विजयनगर असे मृताचे नाव आहे. आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेला असताना धबधबा खाली त्याला दंश झाला. यावेळी तब्येत खालावल्याचे लक्षात येताच सहकारी मित्रांनी त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या पर्यटकाचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. पुढील सोपस्कारासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून सावंतवाडी पोलीसांकडून याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.