
कणकवली : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनासोबतच देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी हृत्वि इलेक्ट्रॉनिक्स आणि बजाज फायनान्स, कणकवली यांच्या वतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कणकवली हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवसायाच्या तिसऱ्या वर्षात पदार्पणाच्या आनंदानिमित्त ३०० वृक्ष, ३०० तिरंगे आणि ३०० फ्री गिफ्ट कुपन वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी कणकवली शहरातील झेंडा चौक येथे ३०० वृक्ष व ३०० तिरंग्यांचे ग्राहकांना आणि नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे, तसेच स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
याचबरोबर हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने ३०० फ्री गिफ्ट कुपनचेही वाटप करण्यात येणार आहे. ११ ऑगस्ट रोजी हे कुपन घेणाऱ्या ग्राहकांनी १५ ऑगस्ट रोजी हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सच्या शॉपला भेट द्यावी. कुपनवर नमूद केलेले फ्री गिफ्ट १५ ऑगस्ट रोजी दुकानात ग्राहकांना देण्यात येणार आहे.‘देशभक्तीसोबत पर्यावरण संवर्धन’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन हृत्वि इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने करण्यात आले आहे.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष आणि तिरंगा वाटपाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम कणकवलीकरांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.












