पक्षशिस्तीला तडा ; भाजपची मोठी कारवाई

23 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 29, 2026 18:20 PM
views 1148  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने पक्षशिस्तीचा कडक संदेश देत मोठी कारवाई केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज कायम ठेवणे अथवा विरोधी उमेदवारांना मदत केल्याच्या आरोपावरून भाजपच्या २३ पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तात्काळ सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकार ही माहिती दिली आहे.

निवडणूक काळात पक्षविरोधी कारवायांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईतून भाजपने दिला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

निलंबित पदाधिकारी / कार्यकर्त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

श्री. राजन बाळकृष्ण चिके – फोंडा, ता. कणकवली

श्री. राजेंद्र दत्ताराम म्हापसेकर – कोनाळकट्टा, ता. दोडामार्ग

श्रीम. सुजाता अजित पडवळ – तुळस, ता. वेंगुर्ला

श्रीम. वंदना किरण किनळेकर – म्हापण, ता. वेंगुर्ला

श्री. विजय महादेव रेडकर – मातोंड, ता. वेंगुर्ला

श्री. जनार्दन रुक्मानंद कुडाळकर – आडेली, ता. वेंगुर्ला

श्री. डायगो (मायकल) फ्रान्सिसी डिसोजा – कोलगाव, ता. सावंतवाडी

श्री. जितेंद्र पांडुरंग गावकर – माजगाव, ता. सावंतवाडी

श्री. योगेश अशोक केणी – इन्सुली, ता. सावंतवाडी

श्री. स्वागत रघुवीर नाटेकर – इन्सुली, ता. सावंतवाडी

श्री. नितीन एकनाथ राऊळ – इन्सुली, ता. सावंतवाडी

श्रीम. शर्वाणी शेखर गावकर – आरोंदा, ता. सावंतवाडी

श्री. उल्हास उत्तम परब – सातार्डा, ता. सावंतवाडी

श्रीम. स्नेहल संदीप नेमळेकर – आरोंदा, ता. सावंतवाडी

श्रीम. साक्षी संदीप नाईक – ता. दोडामार्ग

श्रीम. सुप्रिया शैलेश नाईक – ता. दोडामार्ग

श्रीम. सुनीता कमलाकर भिसे – ता. दोडामार्ग

श्री. प्रवीण नारायण गवस – ता. दोडामार्ग

श्री. अनिरुद्ध फाटक – ता. दोडामार्ग

श्रीम. सोष्मिता अरविंद बांबर्डेकर – ओरोस, ता. कुडाळ

श्री. योगेश राजाराम तावडे – ओरोस, ता. कुडाळ

श्री. रुपेश अशोक पावसकर – नेरूर, ता. कुडाळ

श्री. विजय वासुदेव नाईक – आडेली, ता. वेंगुर्ला