LIVE UPDATES

सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे शनिवारी ‘वैद्यकीय न्यायशास्त्र’ विषयावर व्याख्यान

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 30, 2026 18:18 PM
views 22  views

सावंतवाडी : तालुका वकील संघटनेतर्फे "लेक्स डिस्कशन" (Lex Discussion) या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत सावंतवाडी तालुक्यातील सुप्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. दिगंबर केशव गावकर यांचे विशेष व्याख्यान होणार आहे.

हे व्याख्यान शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालय येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी "वैद्यकीय न्यायशास्त्र" हा महत्त्वपूर्ण विषय निवडण्यात आला आहे. या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा सर्व वकील मंडळी आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाळाजी बाबूराव रणशूर आणि सचिव अ‍ॅड. संकेत अभय नेवगी यांनी केले आहे.