
देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे-सावंतवाडी येथे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भातशेतीविषयक विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना भातशेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन तसेच विविध कृषी पद्धतींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी आरती पाटील, कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण अधिकारी मानसी पवार, बापूसाहेब लांबाडे, वैभव मापारी, निकेतन राणे, नेहा पवार, मुणगे सोसायटीचे चेअरमन गोविंद सावंत, माजी सरपंच साक्षी गुरव, पोलीस पाटील साक्षी सावंत, दादा वळंजू यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.या कार्यशाळेमुळे भातशेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना मिळाली.












