
वेंगुर्ले : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजप तर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून २०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे (सिंधुदुर्ग) यांचे यासाठी मोठे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात एस एस पी एम लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्या मार्फत वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दररोज तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळणार असल्याचे जाहीर केले.
उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व एसएसपीएम मेडिकल कॉलेजचे डॉ एस एस कुलकर्णी यांच्या हस्ते धन्वंतरीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, पंचायत समिती सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष समिधा नाईक, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ चौगुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ लिलखे, मच्छिमार नेते वसंत तांडेल आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या शिबिरात एस एस पी एम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे (सिंधुदुर्ग) येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला. यामध्ये अस्तिरोग तज्ञ डॉ एस एस कुलकर्णी, डॉ आशुतोष दमानिया, नेत्ररोग तज्ञ डॉ क्रांती क्षीरसागर, न्यूरोफिजीशियन डॉ मुकुंद अंबापूरकर, बालरोग तज्ञ डॉ पूनम रायकर, नेक्रोलॉजिस्ट व जनरल फिजिशियन डॉ प्रकाश घोगळे, कान नाक घसा तज्ञ डॉ मिलन सलाने, दंतरोग तज्ञ डॉ प्राची, जनरल सर्जरी डॉ सुरज धुमाळ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ अश्विनी येखंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ शुभम तांबे या तज्ञ डॉक्टरांच्या टीम कडून तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत तांडेल यांनी तर आभार तालुकाध्यक्ष पप्पू परब यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी तुषार साळगावकर, कमलेश गावडे, सायमन आल्मेडा, मारुती दोडशांनटी, संतोष सावंत, भूषण आंगचेकर, भूषण सारंग त्यांच्यासह भाजप पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.











