LIVE UPDATES

शांत असलेला ओंकार पुन्हा खवळला

ओंकार हत्तीने कारवर केला हल्ला : लाखो रुपयांचे नुकसान
Edited by: कोकणसाद Live न्यूज नेटवर्क
Published on: August 25, 2026 23:16 PM
views 128  views

दोडामार्ग : ओंकार हत्तीने दोडामार्ग बांदा मार्ग रोखल्या नंतर फोंडये येथे थेट कारवर हल्ला केला//फोंडये येथील ओगले भटजी यांच्या मालकीची अल्टो कार असल्याची प्राथमिक माहिती// हा प्रकार रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास घडला // कारचा पूर्णपणे चक्काचूर झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले// कळणे मायनिंगकडून डोंगरपालच्या दिशेने जात असताना फोंडये येथील ओगले भटजी यांच्या घरा समोर उभ्या असलेल्या अल्टो कारवर डोक्याने धडक देत सुळे मारून कारचे नुकसान//गाडीत कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली // वनविभाग व प्रशासन करते तरी काय असा आक्रमक ग्रामस्थांचा सवाल