
सावंतवाडी : चंद्रकांत घाटे मित्रमंडळ, सावंतवाडी यांच्यावतीने यंदा सलग २१ व्या वर्षी ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ शनिवार ३१/०१/२०२६ रोजी खालीलप्रमाणे संगीत सभेचे आयोजन केले आहे
अनय घाटे (गोवा) यांचे सोलोहार्मोनियम वादन तसेच सिंधुदुर्गातील प्रथितयश युवा गायक हर्ष नकाशे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन, त्यांना हार्मोनियम साथ मंगेश मेस्त्री (सावंतवाडी) व तबलासाथ निरज भोसले (सावंतवाडी) यांची असून सूत्रसंचालन संजय कात्रे (माणगांव) व गौरखी घाट (सावंतवाडी ) करणार आहेत.
तसेच सावंतवाडीतील सुप्रसिद्ध बासरीवादक उमेश घाटकर यांचा सत्कारही आयोजित केलेला आहे. श्रीराम वाचन मंदिर येथे ३१ जाने. ला सायं. ५.३० वा होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आले आहे.











