
दोडामार्ग : मणेरी कुडासे रस्त्यावर एक मारुती 800 कारने पेट घेतल्याने जळून खाक झाली. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ती कार कोणाची हे अद्याप समजले नाही.
दोडामार्ग येथून मणेरी कुडासे रस्त्यावर एक मारुती 800 कार प्रवास करत होती. अचानक कार मधून धूर बाहेर येऊ लागला. कार मधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कार चालकाने लागलीच प्रसंघावधन राखत बाहेर आले. यानंतर कारने मोठा पेट घेतला आणि कार त्या आगीत जळून खाक झाली.










