LIVE UPDATES

पालकमंत्र्यांनी घेतले सावंतवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे दर्शन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 21, 2026 19:09 PM
views 21  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी सावंतवाडी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेतले. सावंतवाडी पोलीस ठाणे गणेशोत्सव, शहरातील १२१ वर्षांची परंपरा असलेल्या सालईवाडा गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा भट्टीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व चितारआळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचे त्यांनी दर्शन घेतले. 

यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, युवराज लखमराजे भोसले, भाजपा तालुका मंडल अध्यक्ष मधुकर देसाई, नगरपरिषद सभापती तथा भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, नगरपरिषद सभापती सौ. मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगर सेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, माजी नगरसेवक उदय नाईक, दिलीप भालेकर, संतोष तळवणेकर, मनोज हवालदार, राघवेंद्र चितारी, मनोज नार्वेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.