LIVE UPDATES

महाआरोग्य शिबिरास प्रारंभ

दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 20, 2026 11:15 AM
views 103  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. 

शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. परब म्हणाले, दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे‌. २० तज्ञ व इतर ७० डॉक्टर उपस्थित असून रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, नगरसेवक देव्या सुर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, रुग्ण कल्याण समिती सदस्य आमदार प्रतिनिधी देव्या सुर्याजी, जिल्हा सचिव परिक्षीत मांजरेकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, आबा केसरकर, विश्वास घाग, सुप्रिता धारणकर, पूजा नाईक, राजश्री निर्गुण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ संदिप सावंत तसेच के.एल.ई. हॉस्पिटलचे १०० हून अधिक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांचीही यावेळी उपस्थिती होती. या महाआरोग्य शिबिरातून नागरिकांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहत लाभ घेतला.