
सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भनगर समाज भवन, सिंधुदुर्ग समितीची दुसरी महत्त्वाची बैठक १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ओरोस येथील पत्रकार भवन मध्ये संपन्न होणार आहे.
या बैठकीत समाज भवनाच्या नियोजित कामांबाबत आणि पुढील धोरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. जिल्हयातील धनगर समाजाच्या प्रगतीसाठी आणि हक्काच्या वास्तूसाठी धनगर समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे उपाध्यक्ष राजेश वरक यांनी केले आहे. समाजाच्या संघटित शक्तीतून आणि सर्वांच्या सहकार्यातून समाज भवनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.











