
देवरुख : देवदर्शन आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सांगली जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे शुक्रवारी दुपारी १ च्या सुमारास डोंगराच्या कड्यावरून मोठा दगड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे वडील आणि चुलते गंभीर जखमी झाले आहेत. रुत्वी संदीप पाटील (वय ४, रा. कापूसखेड, ता. वाळवा, जि. सांगली) असे या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या चिमुरडीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
कापूसखेड येथील संदीप पाटील हे आपल्या कुटुंबासह श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण कुटुंब मंदिर परिसरात असताना अचानक डोंगराच्या उंच कड्यावरून एक मोठा दगड निसटून थेट खाली कोसळला. हा दगड इतक्या वेगाने आला की, ४ वर्षांच्या रुत्वीला सावरण्याची संधीच मिळाली नाही.
दगडाचा जोरदार मार लागल्याने रुत्वी गंभीर जखमी झाली आणि त्यातच तिचा जागीच प्राण गमवावे लागले. वडील संदीप पाटील आणि चुलते हे देखील जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, देवस्थानचे स्वयंसेवक आणि संगमेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी संदीप पाटील व त्यांच्या भावाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








