
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर करून राज्यातच नव्हे तर देशातही एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि कार्यक्षम होण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळेच कणकवली नगरपंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदन ठरावया मांडला अभिनव आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णयासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे.
ही बाब लक्षात घेता, सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रशासकीय कामात AI प्रणालीचा वापर करणारा महाराष्ट्रातील व भारतातील पहिला जिल्हा ठरल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचा अभिनंदन ठराव सभागृहात एकमताने मंजूर करण्यात यावा, अशी विनंती नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांनी केली











