LIVE UPDATES

रेल्वे धडकेत जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 27, 2026 21:54 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल कारलेवाडी येथे रेल्वे ट्रॅकवर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष महादेव शेदुलकर (वय ५५, रा. कसाल कारलेवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. २७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास कसाल कारलेवाडी परिसरातील रेल्वे ट्रॅकवर संतोष शेदुलकर यांना रेल्वेची धडक बसून ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, चार भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी उपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.