मालवणात उबाठाला धक्का

पंकज वर्दम असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिंदेशिवसेनेत
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 11, 2025 11:50 AM
views 171  views

मालवण : मालवणात उबाठाला धक्का बसला असून उबाठाचे युवासेना उपजिल्हाप्रमुख तथा पोईप ग्रामपंचायत सदस्य पंकज वर्दम यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गावातील विकासकामे मार्गी लावताना रोजगराच्या दृष्टीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. 

पोईप येथे हा पक्षप्रवेश पडला. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी सरपंच शिवारामपंत पालव, पोईप सोसायटी संचालक संतोष हिवाळेकर, शुभम भाटकर, समीर भाटकर, अक्षय हिवाळेकर, सुशील पालव, रुपेश वर्दम, दाजी येरम, नारायण पालव, समीर पालव, यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.