
सावंतवाडी : देशभरात वाढत चाललेल्या पर्यटन क्षेत्राला आणि आंतरराष्ट्रीय पंचतारांकित हॉटेल्स ब्रँड्सना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी सावंतवाडी मळगाव मधील माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सज्ज झाले आहे. गोवा राज्या पासून हाकेच्या अंतरावर, निसर्गरम्य परिसरात वसलेले हे कॉलेज विद्यार्थ्यांना हॉटेल व हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे धडे देणार आहे.
विशेष म्हणजे हे कॉलेज केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी यांच्याशी संलग्न असून विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. या कॉलेजमधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट मिळेल, अशी ग्वाही कॉलेजच्या व्यवस्थापनाने दिली आहे. देशातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अग्रगण्य ब्रँड्स व कॉलेज व्यवस्थापन यांच्यामध्ये सामंजस्य करार असल्याने विद्यार्थ्यांना या ब्रँडच्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंटद्वारे पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होईल. महाविद्यालय हॉटेल्सच्या काही आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी संलग्न असून त्यामार्फत मॉरिशस, अमेरिका, फ्रान्स सिंगापूर मलेशिया दुबई या देशांमध्येही विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी मिळेल. यासाठी इन्स्टिट्यूट मध्ये तज्ञ प्रशिक्षक विद्यार्थ्यांकडून सर्व प्रकारची तयारी करून घेणार आहेत. याशिवाय कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना निवासासाठी उत्तम हॉस्टेलची व्यवस्था आहे.
प्रवेशासाठी 16 ऑगस्ट पर्यंत मुदत
माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घेण्यासाठी शेवटचे काही दिवस उरले असून 16 ऑगस्ट पर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे या संदर्भात विद्यार्थ्यांना www.maiihm.in या वेबसाईटवर किंवा ९३७३०२१६१६ या क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती मिळेल.
माई इन्स्टिट्यूटमध्ये मिळणार या कोर्सेसचे प्रशिक्षण
बीएससी इन हॉस्पिटॅलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन
डिप्लोमा इन फुड प्रोडक्शन
डिप्लोमा इन हाऊस कीपिंग
डिप्लोमा इन फ्रंट ऑफिस ऑपरेशन्स
ॲडव्हान्स सर्टिफिकेट इन हॉस्पिटॅलिटी ऑपरेशन्स
सर्टिफिकेट इन फूड प्रोडक्शन अँड पॅटीसरी
सर्टिफिकेट इन फूड अँड बेवरेज सर्विस
सर्टिफिकेट इन हाऊस कीपिंग